राऊळगाव स्फोटातील जखमींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली भेट
नागपूर:राऊळगाव स्फोटातील जखमींची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.कळमेश्वर तालुक्यातील राऊळगाव येथील एसबीएल या स्फोटके निर्माण करणाऱ्या कंपनीत रविवारी सकाळी स्फोट होऊन १९ श्रमिकांचा मृत्यू झाला, तर जवळपास २३ जण गंभीर जखमी झाले. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज सायंकाळी ऑरेंज सिटी हॉस्पिटल येथे जखमींची […]
नागपूर:राऊळगाव स्फोटातील जखमींची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.कळमेश्वर तालुक्यातील राऊळगाव येथील एसबीएल या स्फोटके निर्माण करणाऱ्या कंपनीत रविवारी सकाळी स्फोट होऊन १९ श्रमिकांचा मृत्यू झाला, तर जवळपास २३ जण गंभीर जखमी झाले. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज सायंकाळी ऑरेंज सिटी हॉस्पिटल येथे जखमींची भेट घेऊन डॉक्टरांशी संवाद साधला. या घटनेतील सर्व जखमींवर आवश्यक ते सर्व उपचार करण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी जखमींच्या कुटुंबियांचीही मुख्यमंत्र्यांनी भेट घेऊन त्यांना धीर दिला, तसेच शासन तुमच्यासोबत असल्याचा विश्वास दिला.
Follow Us:

