Home नंदुरबार जिल्हा 30 जुलैला ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण प्लेसमेंट ड्राईव्ह’ चे आयोजन;47 जागांसाठी होणार...

30 जुलैला ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण प्लेसमेंट ड्राईव्ह’ चे आयोजन;47 जागांसाठी होणार भरती

1
'Chief Minister's Youth Work Training Placement Drive' to be held on July 30; recruitment for 47 positions.

(नंदुरबार) जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार आणि गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालय, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दिनांक 30 जुलै 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता जी. टी. पी. महाविद्यालय, नंदुरबार येथे विशेष ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण प्लेसमेंट ड्राईव्ह’ चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र.सहायक आयुक्त मंगेश वाघ यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगाराची आणि प्रात्यक्षिक प्रशिक्षणाची प्रत्यक्ष संधी उपलब्ध करून देणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे. या प्लेसमेंट ड्राईव्हच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध नामांकित शैक्षणिक संस्था व वैद्यकीय क्षेत्रात एकूण 47 पदे भरली जाणार आहेत.

या मेळाव्यात गजमल तुळशीराम पाटील (GTP) महाविद्यालय, नंदुरबार, श्रीमती एच. जी. श्रॉफ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, नंदुरबार, कृषी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, खांडबारा, ए. एस. मंडळ कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालय, तळोदा, स्मित हॉस्पिटल, नंदुरबार, यशवंत विद्यालय ज्युनियर कॉलेज, नंदुरबार, शासकीय तंत्रनिकेतन (Polytechnic), नंदुरबार या नामांकित संस्था सहभागी होऊन प्रशिक्षणार्थींची निवड करणार आहेत.

जिल्ह्यातील सर्व इच्छुक व पात्र सुशिक्षित बेरोजगारांनी आपल्या आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांसह, बायोडाटा व फोटोंसह या मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा, असेही आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहाय्यक आयुक्त श्री. वाघ यांनी या शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.