Home नंदुरबार जिल्हा उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव; उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार प्रदान

उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव; उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार प्रदान

0
Honouring outstanding officers and employees; presentation of 'Outstanding Employee' awards.

जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे महसूल विभागाच्या कार्याचा गौरव, सेवाभाव वृद्धिंगत करणे आणि नागरिकाभिमुख महसूल प्रशासनाचा संकल्प दृढ करण्याच्या उद्देशाने महसूल दिनउत्साहात साजरा करण्यात आला.

👩‍💼 कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी तसेच जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार आणि महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

📋 यावेळी महसूल विभागाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. नागरिकांना पारदर्शक, गतिमान, जबाबदार आणि लोकाभिमुख सेवा देण्यासाठी महसूल प्रशासन कटिबद्ध असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. विभागाची कार्यक्षमता अधिक सक्षम करण्यासाठी समन्वयाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.

🏅 सन २०२५-२६मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

👏 पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये श्रीमती कल्पना दुबे (उपजिल्हाधिकारी, निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार), श्री संतोष बळीराम डेरे (तहसीलदार, पुनर्वसन केवडिया कॉलनी कॅम्प), श्री दिलीप कुलकर्णी (नायब तहसीलदार, नवापूर), श्री राहुल निकुंभे (सहाय्यक महसूल अधिकारी, उपविभागीय अधिकारी कार्यालय, नंदुरबार), श्री गुणवंत पाटील (महसूल सहाय्यक तथा जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक), श्रीमती वैशाली राजेंद्र गावित (ग्राम महसूल अधिकारी, तहसील कार्यालय अक्कलकुवा), श्री राजेंद्र भिवा शिंदे (पहरेकरी, तहसील कार्यालय शहादा), श्रीमती लता बारक्या पावरा (महसूल सेवक, तहसील कार्यालय तळोदा) आणि श्री दिलवरसिंग मुर्या वळवी (पोलीस पाटील, काकरडे, ता. अक्राणी) यांचा समावेश होता.

🤝 कार्यक्रमाचा समारोप नागरिकांना अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि दर्जेदार महसूल सेवा देण्याच्या सामूहिक संकल्पाने झाला.