महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित (महाबीज) यांनी शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीबरोबरच सेंद्रिय

शाश्वत आणि आधुनिक शेतीला चालना देण्यासाठी नव्याने विकसित केलेल्या विविध उत्पादनांचे लोकार्पण कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. महाबीजच्या ५० व्या वर्धापनदिनानिमित्त महाबीजने नाविन्यपूर्ण अशी चार नवी उत्पादने विकसित केली आहेत. यामध्ये सेंद्रिय कीडनियंत्रण, जलद कचरा व्यवस्थापन, माती परीक्षण तसेच उच्च उत्पादनक्षम सोयाबीन वाणांचा समावेश आहे. “महाबीजच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केवळ दर्जेदार बियाणेच नव्हे, […]
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित (महाबीज) यांनी शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीबरोबरच सेंद्रिय
Maharashtra State Seeds Corporation Limited (Mahabeej) has been promoting organic farming along with increasing farmers' productivity.

शाश्वत आणि आधुनिक शेतीला चालना देण्यासाठी नव्याने विकसित केलेल्या विविध उत्पादनांचे लोकार्पण कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. महाबीजच्या ५० व्या वर्धापनदिनानिमित्त महाबीजने नाविन्यपूर्ण अशी चार नवी उत्पादने विकसित केली आहेत. यामध्ये सेंद्रिय कीडनियंत्रण, जलद कचरा व्यवस्थापन, माती परीक्षण तसेच उच्च उत्पादनक्षम सोयाबीन वाणांचा समावेश आहे.

“महाबीजच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केवळ दर्जेदार बियाणेच नव्हे, तर सेंद्रिय शेती, मातीची सुपीकता वाढविणारी उत्पादने आणि आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे हे राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे. नव्याने विकसित करण्यात आलेली निमास्त्र, महास्पीड, महाबीज कर्बमापक व आर.व्ही.एस.एम. २०११-३५ ही उत्पादने शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीसोबतच खर्चात बचत करून शेती अधिक समृद्ध करण्यास हातभार लावतील.” अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: