धुळे शहरातील वीजपुरवठा व नवीन विद्युत जोडणीसंदर्भातील प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले
धुळे येथील महत्त्वाच्या प्रश्नांवर मुंबईतील निर्मल भवन येथील एमएसआरडीसी कार्यालयात बैठक पार पडली. विज्ञापित यावेळी आमदार अनुप अग्रवाल उपस्थित होते. या बैठकीत धुळे शहरातील वीजपुरवठा, नवीन विद्युत जोडणी, एचटी/एलटी स्थलांतरण, पाणीपुरवठा केंद्रे, औद्योगिक जोडण्या तसेच महावितरणच्या कार्यालयीन इमारतीसंदर्भात सविस्तर सादरीकरण करण्यात आले. अमृत अभियान अंतर्गत भुयारी गटार योजनेतील महादेव मंदिर परिसरातील ४० दशलक्ष लिटर प्रतिदिन […]
धुळे येथील महत्त्वाच्या प्रश्नांवर मुंबईतील निर्मल भवन येथील एमएसआरडीसी कार्यालयात बैठक पार पडली.
विज्ञापित
यावेळी आमदार अनुप अग्रवाल उपस्थित होते. या बैठकीत धुळे शहरातील वीजपुरवठा, नवीन विद्युत जोडणी, एचटी/एलटी स्थलांतरण, पाणीपुरवठा केंद्रे, औद्योगिक जोडण्या तसेच महावितरणच्या कार्यालयीन इमारतीसंदर्भात सविस्तर सादरीकरण करण्यात आले.
अमृत अभियान अंतर्गत भुयारी गटार योजनेतील महादेव मंदिर परिसरातील ४० दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) क्षमतेच्या मलशुद्धीकरण केंद्रासाठी आवश्यक विद्युत जोडणीचे काम गतीने पूर्ण करावे, जेणेकरून हा महत्त्वाचा स्वच्छता प्रकल्प विनाविलंब कार्यान्वित होईल, असे निर्देश राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.
विज्ञापित
Follow Us:

