महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई, : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित करण्यात आलेल्या तसेच देखभाल करण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागांच्या संकेतस्थळे, पोर्टल्स, ॲप्लिकेशन्स आणि नागरिक तसेच व्हीएलई (VLE) सेवांचे डेटा सेंटर स्थलांतर व प्रणाली अद्ययावतीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.
महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद
telkhedi-yethe-mission-saksham-gatiman-margadarshan-shibir-sampanna

या कामामुळे संबंधित ऑनलाइन सेवा शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजल्यापासून तात्पुरत्या स्वरूपात बंद राहणार आहेत.राज्य शासनाच्या डिजिटल सेवांची कार्यक्षमता वाढविणे, तांत्रिक पायाभूत सुविधा अधिक स्थिर करणे तसेच सेवा अधिक विश्वासार्ह आणि सुरक्षित बनविणे, हा या प्रक्रियेचा उद्देश आहे. या तांत्रिक कामाच्या कालावधीत संबंधित संकेतस्थळे, पोर्टल्स, ॲप्लिकेशन्स आणि नागरिक व व्हीएलई सेवा पूर्णपणे अनुपलब्ध राहतील. महाआयटीकडून हे काम सोमवार, १९ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तथापि, तांत्रिक प्रक्रिया आणि प्रणालीची आवश्यक तपासणी पूर्ण झाल्यानंतर मंगळवार, २० ऑक्टोबर २०२६ रोजी सेवा पूर्ववत सुरू होण्याची अपेक्षा आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिक, शासकीय विभाग तसेच संबंधित सेवा वापरणाऱ्यांनी आपले तातडीचे ऑनलाइन अर्ज, आवश्यक कागदपत्रांचे सादरीकरण आणि इतर प्रलंबित ऑनलाइन व्यवहार शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजण्यापूर्वी पूर्ण करून घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. नियोजित देखभाल व प्रणाली अद्ययावतीकरणाच्या कालावधीत होणाऱ्या गैरसोयीबद्दल महाआयटीने दिलगिरी व्यक्त केली असून, अधिक सुरक्षित आणि सक्षम डिजिटल सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असेही कळविण्यात आले आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: