नंदुरबार येथे 31 ऑगस्ट रोजी ‘भटके विमुक्त दिवस’ साजरा होणार

(नंदुरबार) महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या शासन निर्णयानुसार 31 ऑगस्ट हा दिवस राज्यभरात ‘भटके विमुक्त दिवस’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात दिनांक 31 ऑगस्ट 2026 रोजी सामाजिक न्याय भवनात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक सुंदरसिंग वसावे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये […]
नंदुरबार येथे 31 ऑगस्ट रोजी ‘भटके विमुक्त दिवस’ साजरा होणार
'Nomadic and De-notified Tribes Day' will be celebrated in Nandurbar on August 31.

(नंदुरबार) महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या शासन निर्णयानुसार 31 ऑगस्ट हा दिवस राज्यभरात ‘भटके विमुक्त दिवस’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात दिनांक 31 ऑगस्ट 2026 रोजी सामाजिक न्याय भवनात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक सुंदरसिंग वसावे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

सन 1871 मध्ये ब्रिटिश सरकारने ‘क्रिमिनल ट्राईब्स ॲक्ट’ (Criminal Tribes Act) अंतर्गत काही जातींना गुन्हेगार म्हणून घोषित केले होते. या जाचक कायद्यामुळे या जातींमधील समाजबांधवांना स्वातंत्र्यपूर्व काळात अमानुष अन्याय व अत्याचार सहन करावे लागले. देश स्वतंत्र झाल्यानंतर 31 ऑगस्ट 1952 रोजी हा काळा कायदा अधिकृतपणे रद्द करण्यात येऊन या घटकांना ‘विमुक्त जाती’ म्हणून घोषित करण्यात आले.

स्वातंत्र्य लढा, समाजसुधारणा आणि देशाच्या व महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये भटके विमुक्त समाजाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे राहिले आहे. या ऐतिहासिक योगदानाचा सन्मान करण्यासाठी शासनामार्फत 31 ऑगस्ट हा दिवस ‘भटके विमुक्त दिवस’ म्हणून साजरा केला जात आहे. या निमित्ताने नंदुरबार येथे दिनांक 31 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठिक 10:00 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, टोकरतलाव रोड, नंदुरबार येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व नागरिक, समाजबांधव, विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते व मान्यवरांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असेही आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक श्री. वसावे यांनी या प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.