Home नंदुरबार जिल्हा नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांना जयंतीनिमित्त अभिवादन

नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांना जयंतीनिमित्त अभिवादन

0
Tribute paid to the late former Deputy Chief Minister Ajit Pawar on his birth anniversary at Natavadkar Junior College.

नंदुरबार(प्रतिनिधी):-नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांना जयंतीनिमित्त अभिवादन. एकलव्य विद्यालय व ज.ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात आज स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य धर्मेंद्र मराठे, उप प्राचार्य डॉ. गिरीश पवार, पर्यवेक्षक टी एन पाडवी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात कै. अजित पवार यांच्या प्रतिमेस प्राचार्यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. महाविद्यालयाचे विज्ञान प्रमुख प्रा. प्रकाश चौधरी यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणीस उजाळा दिला. अजित पवार हे एक लोकाभिमुख व्यक्तिमत्व होते, जनतेच्या सेवेसाठी तसेच सामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट घेतले. प्रा. प्रकाश चौधरी यांनी बारामती मध्ये झालेल्या विज्ञान प्रदर्शनात अजित पवार यांच्यासोबत आलेला अनुभव सुद्धा विद्यार्थ्यांना सांगितला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. चंद्रकांत देसले यांनी केले. यावेळेस प्रा मीनल वसावे आणि प्रा. वर्षा घासकडबी उपस्थित