Home नंदुरबार जिल्हा महिला व बाल विकास विभाग, नंदुरबार

महिला व बाल विकास विभाग, नंदुरबार

0
Women and Child Development Department, Nandurbar

विषय : महिला लोकशाही दिन आयोजनाबाबत

नंदुरबार जिल्ह्यातील समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे यासाठी महिला व बाल विकास विभाग, शासन निर्णय क्र. महिला-२०२१/प्र.क्र.४२/मकव दिनांक २४/३/२०२३ अन्वये महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची शासकीय यंत्रणेतून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पीडित महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन राबविण्यात येत असतो.

त्यानुसार मे महिन्यात दिनांक १८/०५/२०२६ रोजी दुपारी ०१ वाजता महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी तक्रारदार महिलांनी आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी महिला लोकशाही दिनात दिनांक १८/०५/२०२६ रोजी आपले तक्रार अर्ज घेऊन दुपारी ०१ वाजेपर्यंत रंगावली सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे स्वतः उपस्थित राहावे किंवा

https://meet.google.com/yae-itfi-ukv

या लिंकवर दुपारी ०१.०० ते ०२.०० या वेळेत तक्रार मांडावी.

सदर महिलांची तक्रार वैयक्तिक असावी, न्यायप्रविष्ट व आस्थापना विषयक, सामूहिक तक्रार स्वीकारली जाणार नाही याची नोंद घ्यावी.

#महिला_लोकशाही_दिन#WomenEmpowerment#MahilaLokshahiDin#Nandurbar#WomenRights

#MahilaBalVikas#WomenSupport#PublicGrievance#DistrictAdministration#WomenSafety

#GovernmentInitiative#EmpowerWomen#NandurbarUpdates#महिला_सक्षमीकरण#जिल्हाधिकारी_कार्यालय