३० वर्षांवरील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी : १०० दिवसांचे विशेष आरोग्य अभियान

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे आणि जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या वतीने राज्यातील ३० वर्षांवरील सर्व नागरिक (महिला व पुरुष) यांच्या आरोग्य संरक्षणासाठी "तीस वर्षाचा पल्ला, तपासणी अन् सल्ला" या ब्रीदवाक्यांतर्गत १ सप्टेंबरपासून १०० दिवसांचे विशेष आरोग्य अभियान मिशन मोडवर सुरू करण्यात आले आहे. "आपले आरोग्य, आपली जबाबदारी – आज तपासणी, उद्या निरोगी आयुष्य!" हा संदेश देत हे अभियान तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवले जात आहे.
३० वर्षांवरील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी : १०० दिवसांचे विशेष आरोग्य अभियान
Zilla Parishad, Nandurbar
अभियानाचा मुख्य उद्देश
लवकर निदान व उपचार: आजारांचे प्राथमिक टप्प्यातच निदान करून रुग्णांना वेळेत योग्य उपचारासाठी उपलब्ध करून देणे.
निरोगी महाराष्ट्र: राज्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचवून निरोगी महाराष्ट्र घडवणे.
कोणत्या आजारांची तपासणी होणार?
या १०० दिवसांच्या अभियानामध्ये प्रामुख्याने ३० वर्षांवरील नागरिकांची खालील आजारांसाठी मोफत तपासणी केली जाईल:
मधुमेह (Diabetes): रक्तातील साखरेची तपासणी (Blood Sugar Test).
उच्च रक्तदाब (Hypertension): रक्तदाबाची नियमित तपासणी (BP Test).
कर्करोग तपासणी (Cancer Screening):
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer)
स्तनाचा कर्करोग (Breast Cancer)
मुखाचा कर्करोग (Oral Cancer)
गावनिहाय पथके आणि अंमलबजावणी
अभियान यशस्वी करण्यासाठी गावपातळीवर विशेष पथके तयार करण्यात आली आहेत:
आरोग्य पथक: समुदाय वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक आणि आशा (ASHA) कार्यकर्त्यांचा यामध्ये समावेश आहे.
घरोघरी भेट (Door-to-Door Screening): आशा, एएनएम (ANM) व एमपीडब्ल्यू (MPW) कार्यकर्त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून, त्या रोज सुमारे ४० ते ४५ घरांना भेटी देऊन तपासणी करतील व त्याची नोंद तयार करतील.
पाठपुरावा व उपचाराची सुविधा: तपासणीत आजार आढळल्यास रुग्णांना तातडीने वैद्यकीय सल्ला, मोफत औषधोपचार, नियमित मॉनिटरिंग आणि पर्यवेक्षण (Follow-up) प्रदान केले जाईल.
नागरिकांना आवाहन!
जर तुमचे वय ३० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असेल, तर या १०० दिवसांच्या विशेष अभियानात नक्की सहभागी व्हा.
आजच आपली आरोग्य तपासणी करून घ्या आणि आरोग्यादायी उद्याचे स्वप्न साकार करा!
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250