शहाद्यात पोलिसांचा मोठा छापा! तुरीच्या पिकात लपवलेला १४ लाखांचा गांजा जप्त.

शहादा पोलिसांनी १४ लाख ५३ हजार ७५० रुपये किमतीची हिरवी व सुकी गांजाची झाडे जप्त केली आहेत. शहादा तालुक्यातील मलगाव ते पिपल्यापाणी रस्त्यालगत असलेल्या वनशेत जमिनीत तुरीच्या पिकाआड ही बेकायदेशीर गांजाची शेती केली जात होती.
शहाद्यात पोलिसांचा मोठा छापा! तुरीच्या पिकात लपवलेला १४ लाखांचा गांजा जप्त.
shahada-police-raid-ganja-worth-14-lakh-seized-from-tur-crop
  • जप्त केलेला मुद्देमाल: पोलिसांनी छापा टाकून १९ किलो १७० ग्रॅम हिरवी झाडे, ३ किलो ५५ ग्रॅम सुका गांजा आणि ३ किलो ५७५ ग्रॅम व ४ किलो ८० ग्रॅम वजनाची सुकलेली गांजाची झाडे असा एकूण १४,५३,७५० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
  • आरोपीवर गुन्हा: या प्रकरणी पिपल्यापाणी येथील रहिवासी लक्या उर्फ लक्ष्मण दामा वसावे याच्याविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात एनडीपीएस (NDPS) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • तपास पथक: पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनोद पाटील, दिपक चौधरी, पुरुषोत्तम पवार, भगवान सावळे आणि कपील मंदील यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: