Home क्रीडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली क्रीडा व युवक सेवा संचालनालयाची बैठक झाली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली क्रीडा व युवक सेवा संचालनालयाची बैठक झाली

0
A meeting of the Directorate of Sports and Youth Services was held under the chairmanship of Chief Minister Devendra Fadnavis.

महाराष्ट्रास‍‍ह देशभरातील युवकांना क्रीडा, नवोन्मेष, तंत्रज्ञान, उद्योजकता आणि सांस्कृतिक क्षेत्रातील संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे राष्ट्रीय स्तरावरील ‘विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह-२०२६’ हा तीन दिवसीय भव्य युवा महोत्सव आयोजित असून युवकांना एकत्र आणणारा हा दुवा ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यामध्ये सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधून युवक सहभागी होतील. प्रत्येक राज्य व केंद्रशासित प्रदेशातून सुमारे ३० ते ३५ तर एकूण सुमारे एक हजार प्रतिनिधी सहभागी होतील. यामध्ये महाराष्ट्राचे ३०० प्रतिनिधी, तर इतर राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधून ७०० प्रतिनिधी सहभागी होतील. याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.

हे संमेलन भारताच्या युवा शक्तीला क्रीडा, नवोन्मेष आणि संस्कृतीच्या माध्यमातून एकत्र आणणारा राष्ट्रीय स्तरावरील उपक्रम म्हणून प्रस्तावित आहे. यातून युवकांमध्ये नेतृत्वगुण विकसित करणे, नवोन्मेष व उद्योजकतेला चालना देणे, देशाची सांस्कृतिक विविधता साजरी करणे, आरोग्यपूर्ण जीवनशैलीला प्रोत्साहन देणे आणि राष्ट्रीय एकात्मता दृढ करण्याचाही उद्देश आहे. याची संकल्पना ‘वॉरिअर, फ्युचर आणि कल्चरल असा तीन अनुभव क्षेत्रांमध्ये करावी. या महोत्सवासाठी पूर्णपणे डिजिटल नोंदणी विकसित करावी. ‘खेलो इंडिया’अंतर्गत केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होणार असल्याने महाराष्ट्राने केंद्राच्या योजनांमध्ये प्रभावी सहभाग घेण्याबरोबरच क्रीडा क्षेत्रात खासगी क्षेत्राची गुंतवणूक आणि सार्वजनिक खाजगी भागीदारीवर भर देण्याबरोबर क्रीडा पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्रातील क्रीडा फाउंडेशनशी समन्वय साधण्याबाबत चर्चा करावी. महाराष्ट्राला आगामी दशकात क्रीडा क्षेत्रात आघाडीवर नेण्यासाठी शासकीय प्रयत्नांसोबतच खासगी क्षेत्राची भागीदारी आवश्यक आहे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त दीपक सिंगला आदी उपस्थित होते.