विज्ञापित

के.आर.पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनींची अंडर-17क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी

नंदुरबार:-येथील जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय अंडर-17 मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत कन्हैयालाल रावजीभाई पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला व जिल्हा स्तरावर खेळण्याची संधी संघाला प्राप्त झाली.
के.आर.पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनींची अंडर-17क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी
kr-public-school-vidyarthinichi-under-17-cricket-spardhet-vijayi-salami

या स्पर्धेत विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी संघभावना, शिस्त आणि कौशल्यपूर्ण खेळाच्या जोरावर विजेतेपद मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केले. विजयी संघातील खेळाडू धानी नवनीत जैन, प्रिशा देवेंद्र जैन, अलीशा चुनीलाल गायकवाड, कांचन मनीष कोकणी, खुशी प्रवीण चौधरी, कृतिका दिनेश मोहने, जिज्ञासा प्रकाश पाटील, प्रेक्षा नितेश पाटील, ऋचा संजय शर्मा, रिदम हेमंत अहिरे, गीत इंद्रलाल हिंदुजा, या यशासाठी विद्यार्थिनींना प्रशिक्षक तनमय शाह, जयेश कोळी, विक्की मराठे, निशांक दिवाकर, योगेश बेदरकर, रोहित महाले तसेच यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

विज्ञापित

संघाच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन किशोर वाणी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ वाणी व प्राचार्या डॉ. छाया शर्मा यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत जिल्हा स्तरावरील स्पर्धेसाठी सुभेच्छा दिल्या. याशिवाय शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनीही विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव करून त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

विज्ञापित
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: