के.आर.पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांची अंडर 14 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत विजयी कामगीरी
नंदुरबार:-जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अंडर-14 मुलांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत तालुकास्तरावर के.आर. पब्लिक स्कूल, विद्यार्थी संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत अंतिम सामन्यात विजय मिळवून अजिंक्यपद पटकावले. या उल्लेखनीय यशामुळे शाळेच्या संघाची जिल्हास्तरीय अंडर-14 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. संघाच्या यशामागे क्रिकेट प्रशिक्षक तनमय शाह, निशांक दिवाकर, जयेश कोळी आणि रोहित महाले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
विजेत्या संघातील खेळाडू यश पटेल, जीवन पटेल, हर्षल ढोले, कनिष्क पटेल, साई पटेल, नीरज पटेल, कल्पेश पाटील, आयुष चौधरी, नीलभाई पटेल, अब्दुल्ला खाटीक, गुंजन शर्मा, यशवंत जगदाळे, वेदांत वळवी, प्रिन्स गावीत, यज्ञेश पाटील आणि तन्मय गिरासे.
संघाच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन किशोर वाणी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ वाणी व प्राचार्या डॉ. छाया शर्मा यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांना भविष्यात अधिक प्रगती करण्यासाठी प्रेरणा दिली. याशिवाय शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनीही विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
विज्ञापित
विज्ञापित
Follow Us:

