भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र प्रादेशिक शाखेच्या वतीने विविध विषयांवर एक दिवसीय प्रशिक्षण मंत्रालयात पार पडले.
उद्घाटन संस्थेचे प्रादेशिक शाखा मंत्रालय, मुंबईचे मानद खजिनदार विकास देवधर आणि विशेष कार्य अधिकारी शशांक बर्वे यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी शासकीय खरेदी प्रक्रिया आणि गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (जीईएम) पोर्टल यासंदर्भात उद्योग संचालनालयाचे उपसंचालक (मध्यवर्ती भांडार खरेदी संघटना) नितीन कोळेकर आणि उद्योग संचालनालयातील जीईएम पोर्टलचे तज्ज्ञ कार्यकारी शैलेश जाधव यांनी मार्गदर्शन केले. शासनासाठी लागू असलेल्या खरेदी नियमावली […]
उद्घाटन संस्थेचे प्रादेशिक शाखा मंत्रालय, मुंबईचे मानद खजिनदार विकास देवधर आणि विशेष कार्य अधिकारी शशांक बर्वे यांच्या उपस्थितीत झाले.
यावेळी शासकीय खरेदी प्रक्रिया आणि गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (जीईएम) पोर्टल यासंदर्भात उद्योग संचालनालयाचे उपसंचालक (मध्यवर्ती भांडार खरेदी संघटना) नितीन कोळेकर आणि उद्योग संचालनालयातील जीईएम पोर्टलचे तज्ज्ञ कार्यकारी शैलेश जाधव यांनी मार्गदर्शन केले.
शासनासाठी लागू असलेल्या खरेदी नियमावली व धोरण २०१६, खरेदीचे विविध प्रकार, सूक्ष्म व लघु उद्योग तसेच अनुसूचित जाती/जमाती आणि महिला उद्योजकांसाठी असलेले आरक्षण याबाबत तसेच जीईएम पोर्टलवरील नोंदणी प्रक्रिया, खरेदीची कार्यपद्धती, निविदा प्रक्रिया आदी महत्त्वाच्या सुविधांबाबत उपस्थितांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.
Follow Us:

