नागरिकांसाठी पोस्ट कार्यालयांमध्ये आधार आणि पासपोर्ट सेवा सुरू
नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना आता आधार नोंदणी, आधार अद्ययावत करणे (अपडेट) आणि पासपोर्टसंबंधी सेवांसाठी इतरत्र भटकण्याची गरज उरणार नाही. भारतीय डाक विभागाच्या धुळे विभागाच्या वतीने जिल्ह्यातील प्रमुख पोस्ट कार्यालयांमध्ये या अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती प्रवर अधीक्षक डाकघर, धुळे विभाग यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.
नागरिकांना सुलभ, पारदर्शक व विनाअडथळा सेवा मिळावी यासाठी टपाल कार्यालयांमध्ये विशेष प्रशिक्षित कर्मचारी आणि आधुनिक आधार किट्स तैनात करण्यात आले आहेत. यामुळे नागरिक आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आधार व पासपोर्टविषयक कामे सहजरित्या पूर्ण करू शकणार आहेत.
आधार नोंदणी व अद्ययावत (Update) सेवा उपलब्ध असलेली कार्यालये:
खालील उप टपाल कार्यालयांमध्ये आधार नवीन नोंदणी व दुरुस्तीची सुविधा उपलब्ध आहे:
• नंदुरबार सब पोस्ट ऑफिस
• नवापुर सब पोस्ट ऑफिस
• शहादा सब पोस्ट ऑफिस
• अक्कलकुवा सब पोस्ट ऑफिस
• तळोदा सब पोस्ट ऑफिस
• धडगाव सब पोस्ट ऑफिस
नवीन पासपोर्ट व नूतनीकरण (Passport Renewal) सेवा:
पासपोर्ट काढू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी सब पोस्ट ऑफिस जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार या केंद्रांवर पासपोर्ट सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे
भारतीय डाक विभाग हा नागरिकांना अधिक विश्वासार्ह आणि सुलभ सेवा देण्यासाठी नेहमीच कटिबद्ध आहे. सर्व नागरिकांनी या सेवांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन प्रवर अधीक्षक डाकघर, धुळे विभाग धुळे यांनी या प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

