Home शैक्षणिक होटाळा येथे अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी, शालेय साहित्याचे वाट

होटाळा येथे अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी, शालेय साहित्याचे वाट

0
Annabhau Sathe Jayanti celebrated with enthusiasm at Hotala, school supplies awaited

नरसी(प्रतीनिधी):-येथून जवळच असलेल्या होटाळा (ता.नायगांव) येथे प्रतीवर्षाप्रमाणे यावर्षी देखील साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती 23 ऑगस्ट रोजी उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड जि.प.चे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर होते. उद्घाटक म्हणून जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र पाटील बावणे उपस्थित होते. यावेळी माजी सरपंच गणेश पवार, शिवाजी पवार, संजय महाराज बन, जेजेराव पा. पवार, आनंद पाटील शिंदे, गंगाधरराव गंगासागरे, शिवराज गायकवाड, बालासाहेब पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी मान्यवरांसह चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारी मनोगते व्यक्त केली.

अध्यक्षीय समारोपात शिवराज पाटील होटाळकर यांनी गावच्या विकासासाठी तसेच सर्व समाजांनी हाती घेतलेल्या विधायक उपक्रमांसाठी आपण सदैव सोबत राहू, असे आश्वासन दिले.
जयंती मंडळाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते गंगाधर कोत्तेवार यांनी केले. दरम्यान, दुपारनंतर गावातील मुख्य रस्त्यावर अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत नागरिकांसह महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण गावात जयंतीनिमित्त उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष निशांत कोत्तेवार, मल्हारी कोत्तेवार, आनंदा गदले, करण कोत्तेवार, रमेश कोत्तेवार, माणिक कोत्तेवार, अभिजीत कोत्तेवार, बळीराम कोत्तेवार आदींनी परिश्रम घेतले.