विज्ञापित

आदर्श आश्रमशाळेत प्रवेशासाठी 10 मार्च पर्यंत अर्ज जमा करावे

(नंदुरबार) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार अंतर्गत शासकीय आदर्श आश्रमशाळा, खामगाव रोड नंदुरबार येथे सन 2026-27 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 5 वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून 10 मार्च, 2026 पर्यंत प्रवेश अर्ज प्रकल्प कार्यालयाच्या शिक्षण शाखेत जमा करावे असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार यांनी एका […]
आदर्श आश्रमशाळेत प्रवेशासाठी 10 मार्च पर्यंत अर्ज जमा करावे
Applications for admission to Adarsh ​​Ashram School should be submitted by March 10.

(नंदुरबार) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार अंतर्गत शासकीय आदर्श आश्रमशाळा, खामगाव रोड नंदुरबार येथे सन 2026-27 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 5 वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून 10 मार्च, 2026 पर्यंत प्रवेश अर्ज प्रकल्प कार्यालयाच्या शिक्षण शाखेत जमा करावे असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

विज्ञापित

पात्रता निकष

• विद्यार्थी 2025-26 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 4 थी मध्ये शासकीय / अनुदानित आश्रमशाळा किंवा जिल्हा परिषद शाळेत शिकत असावा.

• प्रवेशार्थी विद्यार्थी अनुसूचित जमातीचे असावेत.

• ते महाराष्ट्र राज्याचे आदिवासी असावेत.

• पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये 1 लाखापेक्षा अधिक नसावे.

• ही प्रवेश परीक्षा उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या धर्तीवर घेतली जाईल.

प्रवेश परीक्षा रविवार दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11:00 ते 12:30 या वेळेत होणार असून प्रवेश अर्ज 10 मार्च 2026 प्रकल्प कार्यालयाच्या शिक्षण शाखेत कार्यालयीन वेळेत जमा करावे, असेही प्रकल्प अधिकारी श्री. पवार यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

विज्ञापित
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: