आमदार आमशा पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य संपन्न गाव मोहिमेचे धडगाव येथे तालुकास्तरीय नियोजन
ही कार्यशाळा आमदार आमशा पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र सोनवणे, गटविकास अधिकारी पूजा गायकवाड, माजी सभापती शंकर पाडवी, जि.प.चे माजी सदस्य विजयसिंग पराडके, माजी सभापती गणेश पराडके आणि तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
- सहभाग: या कार्यशाळेला आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकारी आणि विस्तार अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच जवळपास १ हजार महिला या कार्यक्रमाला हजर होत्या.
- मुख्य चर्चा व मार्गदर्शन:
- आरोग्य विभागाच्या या उपक्रमात प्रामुख्याने बाल व मातामृत्यू दरावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
- प्रास्ताविक विस्तार अधिकारी सिंधू गवळी यांनी केले. अभियानातील गुणांकन पद्धती व गुणाानुक्रमांकाबाबत डॉ. बापू निकम यांनी माहिती दिली.
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र सोनवणे यांनी ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ या संकल्पनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गाविनहाय नियोजन, आरोग्यविषयक निर्देशांकांमध्ये सुधारणा आणि विविध विभागांच्या सहभागाचे महत्त्व स्पष्ट करून आरोग्य सेवेचा आढावा सादर केला.
Follow Us:

