गणरायाचे आगमन चित्र रेखाटनातून सामाजिक संदेश : कलाशिक्षक धर्मेंद्र तांबोळी
कलाशिक्षक धर्मेंद्र तांबोळी त्यांच्या या कार्यशैलीचे दखल घेत त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे व विविध संस्थांमार्फत त्यांच्या गौरव देखील करण्यात आलेला आहे. उद्या होऊ घातलेला गणेशोत्सव व गणरायाचे आगमन या पार्श्वभूमीवर त्यांनी फळ्यावर चित्र रेखाटन करताना सर्वांना आकर्षित होईल अशा प्रकारचे रेखाटन केले आहे. गणपती बाप्पा ज्या मार्गातून येत आहे त्या मार्गावर मोठमोठाली खड्डे निर्माण झाली असून शहर खड्डे मुक्त कसे होईल याकडे लक्ष आकर्षण घेणारे चित्र काढले आहे त्यामुळे एक सामाजिक संदेश देखील या माध्यमातून देण्याच्या त्यांनी प्रयत्न केला आहे. शिवाय बाप्पा येत असताना निसर्गचक्राने देखील साथ द्यावी म्हणून सोबत एक बालक छत्री घेऊन त्यांना आणत असल्याचे भावपूर्ण चित्र दाखविले आहे. पावसाळ्यात पाऊस आला नाही त्यामुळे शेतकरी व जनजीवन विस्कळीत झाले होते. आम्ही तुझे थाटात आगमन करतो त्यामुळे तू सोबत येताना पाऊस देखील येत आहे असे भावुक चित्र देखील त्यांनी रंगवण्याच्या प्रयत्न केलेला आहे.
हे चित्र पाहण्यासाठी विद्यार्थी व शिक्षकांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाली होती. आता तरी प्रशासनाला जाग येईल का व शहरातील रस्ते खड्डे मुक्त होतील का याकडे विद्यार्थी शिक्षकांचे लक्ष लागून आहे त्यांनी काढलेल्या चित्राचे संस्थेचे सचिव प्रा संजय जाधव, सोना माई शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव वर्षा जाधव प्रशासकीय प्रमुख डॉ हिमांशू जाधव, शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील कौतुक केले आहे.
- चित्राचा मुख्य विषय: चित्रात एक लहान मुलगा मुसळधार पावसात छत्री धरून स्वतः गणपती बाप्पाला सोबत घेऊन चालताना दिसत आहे. रस्त्यावर पाण्याचे डबके साचले असून रस्ता खड्ड्यांनी भरलेला आहे, अशी कल्पना यात मांडली आहे.
- सामाजिक संदेश: चित्राच्या डाव्या बाजूला “यंदा तरी खड्ड्यांचे हे ग्रहण सुटू दे बाप्पा!” असा संदेश लिहिला आहे. यातून दरवर्षी सणासुदीच्या काळात नागरिकांना आणि गणेशभक्तांना रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या त्रासाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे.
-
- विद्यार्थ्यांना प्रेरणा: डिजिटल युगात फळ्यावर प्रत्यक्ष खडूने एवढी जिवंत चित्रे पाहिल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चित्रकला या विषयाची गोडी आणि स्वतः काहीतरी निर्माण करण्याची प्रेरणा मिळते.
- सांस्कृतिक प्रबोधन: येणाऱ्या सण-उत्सवांचे महत्त्व आणि पार्श्वभूमी विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या व दृश्यात्मक (Visual) माध्यमातून समजते.
- कलेतून आनंद आणि संदेश: त्यांच्यासाठी ही कला केवळ छंद नसून, त्यातून त्यांना मनस्वी आनंद मिळतो. तसेच, प्रत्येक चित्रातून ते समाजातील चालू घडामोडींवर प्रकाश टाकणारा एक सकारात्मक संदेश देण्याचे मोलाचे काम करत आहेत.

