स्वच्छतेनंतर शारदा नगरच्या ओपन प्लेसची लोकनियुक्त नगराध्यक्षांकडून पाहणी

शहादा:-गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहादा शहरातील मोकळ्या जागांच्या स्वच्छतेला वेग देण्यात आला असून, शारदा नगर परिसरातील ओपन प्लेसची स्वच्छता पूर्ण झाल्यानंतर लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी केली.
स्वच्छतेनंतर शारदा नगरच्या ओपन प्लेसची लोकनियुक्त नगराध्यक्षांकडून पाहणी
swachhatenantar-sharda-nagarchya-open-placechi-lokaniyukt-nagaradhyakshankadun-pahani

स्वच्छता झालेल्या ओपन प्लेसची पाहणी करताना नगराध्यक्षांनी परिसरातील परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी शारदा नगरमधील रहिवाशांशी संवाद साधून ओपन प्लेससह परिसरातील विविध समस्या जाणून घेतल्या.
गणेशोत्सवाच्या काळात या मोकळ्या जागेचा नागरिक व गणेश मंडळांकडून वापर होणार असल्याने स्वच्छता, परिसरातील कचरा, वाढलेले गवत, झाडांच्या फांद्या तसेच आवश्यक असलेल्या इतर कामांबाबत नागरिकांनी नगराध्यक्षांच्या निदर्शनास बाबी आणून दिल्या.
यावेळी नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांनी नागरिकांचे म्हणणे प्रत्यक्ष ऐकून घेत संबंधित समस्यांबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. गणेशोत्सवा पुरतीच नव्हे तर परिसर स्वच्छ व व्यवस्थित राहण्यासाठी नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
शारदा नगरच्या रहिवाशांशी थेट संवाद साधत परिसरातील अडचणी समजून घेण्याच्या नगराध्यक्षांच्या या पाहणीमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनीही परिसरातील स्वच्छता व इतर नागरी सुविधांबाबत प्रशासनाला वेळोवेळी माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांतील मोकळ्या जागा स्वच्छ व वापरासाठी योग्य करण्याच्या दृष्टीने नगरपालिका प्रशासनाकडून सुरू असलेल्या कामाचा आढावा घेत नगराध्यक्षांकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात येत आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250