अमरावती विभागाच्या राज्य सेवा हक्क आयुक्तपदी अरुण डोंगरे

मुंबई: सामान्य प्रशासन विभागाच्या 30 एप्रिल 2026 च्या अधिसूचनेनुसार अरुण किशोर डोंगरे यांची अमरावती विभागाच्या राज्य सेवा हक्क आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनु कुमार श्रीवास्तव यांनी डोंगरे यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. नवीन प्रशासन भवन, मुंबई येथील महाराष्ट्र राज्य सेवा हक्क […]
अमरावती विभागाच्या राज्य सेवा हक्क आयुक्तपदी अरुण डोंगरे
Arun Dongre appointed as State Service Rights Commissioner of Amravati Division

मुंबई: सामान्य प्रशासन विभागाच्या 30 एप्रिल 2026 च्या अधिसूचनेनुसार अरुण किशोर डोंगरे यांची अमरावती विभागाच्या राज्य सेवा हक्क आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनु कुमार श्रीवास्तव यांनी डोंगरे यांना पद व गोपनियतेची शपथ दिली.

नवीन प्रशासन भवन, मुंबई येथील महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या कार्यालयात झालेल्या शपथग्रहण सोहळ्यामध्ये माजी आयुक्त दिलीप शिंदे यांनी नियुक्तीची अधिसूचना वाचून दाखविली.अमरावती विभागाच्या राज्य सेवा हक्क आयुक्तपदी काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल नवनियुक्त आयुक्त अरुण डोंगरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनु कुमार श्रीवास्तव तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आभार मानले.

या शपथविधी सोहळ्याला विधानसभा सदस्य करण देवतळे, राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे, कोकण विभागाचे राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंह, पुणे विभागाचे राज्य सेवा हक्क आयुक्त सुधाकर तेलंग तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: