भुरीवेल प्रकल्प १०० टक्के भरला; सुकी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
नवापूर तालुक्यातील भुरीवेल लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने प्रकल्प १०० टक्के क्षमतेने भरला असून सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर सुकी नदीकाठावरील भुरीवेल, थुवा, आमपाडा, गढद, खाटीआंबा व इतर गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे. नदीपात्रामध्ये राहुट्या सोडण्यात येऊ नयेत, कोणत्याही मनुष्याने नदीपात्रात जाऊ नये तसेच नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे […]
नवापूर तालुक्यातील भुरीवेल लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने प्रकल्प १०० टक्के क्षमतेने भरला असून सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.
या पार्श्वभूमीवर सुकी नदीकाठावरील भुरीवेल, थुवा, आमपाडा, गढद, खाटीआंबा व इतर गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे.
नदीपात्रामध्ये राहुट्या सोडण्यात येऊ नयेत, कोणत्याही मनुष्याने नदीपात्रात जाऊ नये तसेच नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
सतर्क राहा • सुरक्षित राहा
Follow Us:

