नाशिकच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ५० ई-बसेसचे लोकार्पण
नाशिक शहरासाठी दाखल झालेल्या ५० ई-बसेसचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. नाशिक शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक, पर्यावरणपूरक आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पीएमई-बस सेवा योजनेंतर्गत ५० ई-बसेसचे नाशिककरांच्या सेवेत दाखल होत आहेत.
या बसेसच्या माध्यमातून नागरिकांना विश्वासार्ह व दर्जेदार प्रवासाची सुविधा मिळणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
यावेळी पालकमंत्री गिरीष महाजन, महानगरपालिकेच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
