चाचडगाव कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक च्या कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय, चाचडगांव, ता. दिंडोरीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन व कोनशिला अनावरण करण्यात आले.
या कार्यक्रमात संस्थेच्यावतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २५ लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला. तसेच संस्थेचे मुखपत्र असलेल्या ‘मविप्र पत्रिका’च्या गुणवंत अंकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री गिरीष महाजन, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार डॉ. शोभा बच्छाव, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार भास्कर भगरे, नाशिक महानगरपालिकेच्या महापौर हिमगिरी आहेर-आडके, आमदार सीमा हिरे, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार राहुल ढिकले, आमदार हिरामण खोसकर, आमदार दिलीप बोरसे, आमदार दिलीप बनकर, नाशिक महानगरपालिकेचे उपमहापौर विलास शिंदे, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे आदी उपस्थित.
