रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल यांच्यामार्फत ससाळे व अणसुरे विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता आयडियल स्टडी ॲप कार्ड वितरण संपन्न
सदरचे वितरण गांगेश्वर विद्यालय ससाळे आणि सिद्धिविनायक माध्यमिक विद्यामंदिर, अणसुरे या शाळांमधील दहावी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले मोबाईल, टॅब व डेस्क टॉप वर वापरता येणाऱ्या या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणात्मक विकास साधणे अधिक सुलभ होणार आहे याचे वितरण करण्यासाठी पुढाकार घेणारे नितीन बांदेकर माजी अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल तसेच लिटरसी चेअरमन वर्षा बांदेकर ज्यांनी सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सांगली मिरज इचलकरंजी व गोवा येथील हजारो विद्यार्थ्यांसाठी स्वखर्चाने हे कार्ड वितरित केले असून प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह हा उपक्रम राबविला जात आहे.
प्रामुख्याने ग्रामीण भागातील हुशार मात्र ज्यांच्या पर्यंत अभ्यासपूरक साहित्य पोहोचू शकत नाही अशा विद्यार्थ्यांपर्यंत हे ॲप पोहोचविण्याचा बांदेकर परिवाराचा हा प्रयत्न दिसून येत आहे एम. आयडियल स्टडी ॲप कार्ड वितरण यशस्वी करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा देवगड तालुक्यातील पेंढरी हायस्कूलचे मुख्याध्यापक सत्यपाल लाडगावकर यांनी मोलाचे सहकार्य केले त्यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वापराचे फायदे आपल्या अनुभवातून कथन केले. संपूर्ण कार्यक्रम आयोजन करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल चे प्रेसिडेंट श्रीमती सुप्रिया नलावडे, सेक्रेटरी डॉ.अमेय मराठे, गांगेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र डांगवे. सहा. शिक्षिका श्रीमती पवार, श्रीमती ढवळे, क.लिपिक अमोल शिंदे कर्मचारी हेमंत शिंदे या सर्वांचे सहकार्य मिळाले.
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक डांगवे यांनी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सन सिटी व रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल, बांदेकर परिवार व सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त करत असे सहकार्य सातत्याने लाभेल अशी आशा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय मांडवकर यांनी केले.

