मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अमरावती येथे ‘सुजान सर्जिकल अँड कॅन्सर हॉस्पिटलचे’ उद्घाटन करण्यात आले.
अमरावतीच्या गरजू रुग्णांकरिता ‘सुजान सर्जिकल आणि कॅन्सर हॉस्पिटल’ सुरू करण्यात आले असून, यामुळे कॅन्सरग्रस्त रुग्णांना दिलासा मिळणार आहे. कॅन्सर सारख्या आजाराचे योग्यवेळी निदान झाल्यास तो बरा होऊ शकतो. कॅन्सरचे योग्यवेळी निदान होऊन त्यावर योग्य उपचार व्हावेत यासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे ‘महाराष्ट्र शासन ग्रीड’ उभे करण्यात येत आहे. ज्यात कॅन्सर बरा होण्यासाठी रुग्णांना लागणाऱ्या सर्व सेवा देण्यात […]
अमरावतीच्या गरजू रुग्णांकरिता ‘सुजान सर्जिकल आणि कॅन्सर हॉस्पिटल’ सुरू करण्यात आले असून, यामुळे कॅन्सरग्रस्त रुग्णांना दिलासा मिळणार आहे. कॅन्सर सारख्या आजाराचे योग्यवेळी निदान झाल्यास तो बरा होऊ शकतो. कॅन्सरचे योग्यवेळी निदान होऊन त्यावर योग्य उपचार व्हावेत यासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे ‘महाराष्ट्र शासन ग्रीड’ उभे करण्यात येत आहे. ज्यात कॅन्सर बरा होण्यासाठी रुग्णांना लागणाऱ्या सर्व सेवा देण्यात येणार आहेत. या संपूर्ण सेवेत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा उपयोग करून सामान्यातल्या सामान्य नागरिकालाही कमी दरात किंवा मोफत उपचार देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
यावेळी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, माजी खासदार नवनीत राणा व इतर मान्यवर उपस्थित होते.
Follow Us:

