कुणबी समाजोन्नती संघ,मुंबई या मातृसंघटनेचा 106 वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न

मुंबई:-कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई या आपल्या मातृ संघटनेचा 106 वा वर्धापन दिन सोहळा 1 ऑक्टोबर 2026 रोजी वाघे हॉल, कुणबी ज्ञाती गृह, परळ, मुंबई येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्याचे अध्यक्षस्थान संघाध्यक्ष अनिल नवगणे यांनी भूषविले.
कुणबी समाजोन्नती संघ,मुंबई या मातृसंघटनेचा 106 वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न
Anniversary Celebration of Parent Organization Kunbi Samajonnati Sangh, Mumbai Held with Enthusiasm

समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात सकारात्मक बदल घडविण्यासाठी सातत्यपूर्ण व अविरतपणे कार्यरत राहणारी संघटना, तसेच प्रबोधनाच्या माध्यमातून समाजाला उन्नतीकडे नेणारा नवा विचार आणि नवी दिशा देणारी संघटना म्हणजेच कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई होय. या गौरवशाली वाटचालीचा साक्षीदार होण्यासाठी 106 व्या वर्धापन दिन सोहळ्यास संघाचे उपाध्यक्ष शंकरराव म्हसकर, बबन उंडरे, एड.अवधूत पुरस्कार, सरचिटणीस कृष्णा वणे, सहचिटणीस माधव कांबळे, प्रमोद खेराडे, संजय उमासरे, रवींद्र कुरतडकर, ज्येष्ठ कार्यकारिणी सदस्य मधुकर तोरस्कर, राजा कातकर, सदानंद काष्टे, अरविंद डाफले, कुणबी बँक संचालक संतोष चौगुले, विवाह सल्लागार मंडळाचे अध्यक्ष सुरेश घडवले, कुणबी युवा अध्यक्ष युवराज संतोष, जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्था जिल्हाध्यक्ष रत्नागिरी अँड. महेंद्र मांडवकर, कुणबी युवा मुंबईचे सरचिटणीस सचिन रामाणे, उपाध्यक्ष मिलिंद चिंबडे, अँड. महेश अंबावले, सहचिटणीस पंकज पालकर, बारकू बेंडल, खजिनदार पांडुरंग दोडेकर, महिला मंडळ उपाध्यक्ष स्मिता गोंधळी यांच्यासह तालुका शाखांचे अध्यक्ष, सरचिटणीस, पदाधिकारी, युवक मंडळाचे अध्यक्ष, सरचिटणीस, पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने समाज बांधव-भगिनी उपस्थित होते. यावेळी विविध तालुका शाखांच्या पदाधिकाऱ्यांनी 106 व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत संघटनेच्या आजवरच्या कार्याचा गौरव केला. तसेच संघटनेची भविष्यातील वाटचाल, समाजासमोरील आव्हाने आणि समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी करावयाच्या कार्याबाबत आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मंचावरील मान्यवरांनी कुणबी समाजोन्नती संघाचा गौरवशाली इतिहास, समाजासाठी संघटनेने सातत्याने केलेली लढाई आणि सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक, आर्थिक तसेच राजकीय उन्नतीसाठी केलेले विविध प्रयत्न यावर सविस्तर विचार मांडले.
अध्यक्षीय भाषणात संघाध्यक्ष अनिल नवगणे यांनी सांगितले की, “मी तरुण असून मला कुणबी समाजोन्नती संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आपण सर्वांनी दिली, त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभारी आहे.” येणाऱ्या काळात संघटनेचे विचार आणि संघटन गावपातळीपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी सर्व स्तरांवर सातत्याने प्रयत्न केले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 106 वर्षांची ही गौरवशाली परंपरा पुढे नेत संघटन, प्रबोधन आणि सामाजिक उन्नतीचा विचार अधिक व्यापक करण्याचा संकल्प या वर्धापन दिन सोहळ्यात व्यक्त करण्यात आला.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: