शिरपूर येथील केतकीबेन मुकेशभाई पटेल सेंट्रल लायब्ररीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली.
आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा आदी उपस्थित होते.शिरपूर शहरात जलसंधारणासोबतच शिक्षण, आरोग्य व औद्योगिक क्षेत्रात झालेली प्रगती ही राज्यासाठी पथदर्शी आहे. येथील सेंट्रल लायब्ररी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानकेंद्र ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. शिरपूरमध्ये राबविण्यात आलेले जलसंधारण मॉडेल यापूर्वी राज्यात आदर्श ठरले असून, आता शिक्षण क्षेत्रातही शिरपूरने देशपातळीवर वेगळा ठसा उमटविला […]
आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा आदी उपस्थित होते.शिरपूर शहरात जलसंधारणासोबतच शिक्षण, आरोग्य व औद्योगिक क्षेत्रात झालेली प्रगती ही राज्यासाठी पथदर्शी आहे. येथील सेंट्रल लायब्ररी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानकेंद्र ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
शिरपूरमध्ये राबविण्यात आलेले जलसंधारण मॉडेल यापूर्वी राज्यात आदर्श ठरले असून, आता शिक्षण क्षेत्रातही शिरपूरने देशपातळीवर वेगळा ठसा उमटविला आहे. शहरात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा, सेंट्रल लायब्ररी तसेच नव्याने सुरू करण्यात आलेल्या आधुनिक रुग्णालयामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Follow Us:

