Home नंदुरबार जिल्हा आपले सरकार पोर्टलवरील प्रलंबित तक्रारींचा जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांनी घेतला आढावा

आपले सरकार पोर्टलवरील प्रलंबित तक्रारींचा जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांनी घेतला आढावा

0
District Collector Dr. Mittali Sethi reviewed the pending complaints on the 'Aaple Sarkar' portal.

नंदुरबार : जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली आपले सरकार पोर्टलवरील प्रलंबित तक्रारींच्या अनुषंगाने साप्ताहिक आढावा बैठक घेण्यात आली.

🔹 बैठकीदरम्यान विविध विभागांकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले.

🔹 तक्रारींचा विहित कालमर्यादेत निपटारा न झाल्याबाबत संबंधित विभागप्रमुखांची जिल्हाधिकारी यांनी गंभीर दखल घेतली.

🔹 मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्रलंबित असलेल्या विभागप्रमुखांना दाखवा नोटीस (Show Cause Notice) बजावण्याचे निर्देश देण्यात आले.

🔹 प्रलंबित तक्रारींचे तातडीने परीक्षण करून नियमानुसार आवश्यक कार्यवाही करावी, तसेच पात्र तक्रारींचा त्वरित निर्णय घेऊन त्याची नोंद आपले सरकार पोर्टलवर अद्ययावत करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांनी दिले.

🔹 सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागाकडील प्रलंबित तक्रारींचा नियमित आढावा घेऊन त्या विहित कालमर्यादेत निकाली काढण्यासाठी विशेष दक्षता घ्यावी, असेही निर्देश देण्यात आले.

📢 नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करून प्रशासन अधिक उत्तरदायी, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यावर जिल्हा प्रशासनाचा भर आहे.