जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार

नंदुरबार : वातावरणातील बदलामुळे विशेषतः उन्हाळी हंगामात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता वाढत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता अधिक असते. विशेषतः झोपडपट्टी भागात राहणारे नागरिक, रस्त्यालगत अथवा उघड्यावर काम करणारे मजूर, फिरते विक्रेते, बस स्थानक, रेल्वे स्थानक, यात्रास्थळे, धार्मिक स्थळे, विवाह समारंभ, बाजार समित्या तसेच आठवडी बाजार […]
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार
District Disaster Management Authority, Collector's Office, Nandurbar

नंदुरबार : वातावरणातील बदलामुळे विशेषतः उन्हाळी हंगामात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता वाढत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता अधिक असते.

विशेषतः झोपडपट्टी भागात राहणारे नागरिक, रस्त्यालगत अथवा उघड्यावर काम करणारे मजूर, फिरते विक्रेते, बस स्थानक, रेल्वे स्थानक, यात्रास्थळे, धार्मिक स्थळे, विवाह समारंभ, बाजार समित्या तसेच आठवडी बाजार परिसरात काम करणारे नागरिक, वृद्ध व्यक्ती, महिला आणि लहान मुले यांना उष्णतेचा सर्वाधिक फटका बसू शकतो.

उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे. पुरेसे पाणी पिणे, दुपारच्या कडक उन्हात बाहेर जाणे टाळणे, हलक्या रंगाचे सैल कपडे वापरणे, डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करणे तसेच शरीरात अशक्तपणा, चक्कर येणे किंवा डोकेदुखी जाणवल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.

जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, अति उष्णतेच्या काळात स्वतःची व कुटुंबीयांची विशेष काळजी घ्यावी तसेच उष्माघातासंदर्भातील आरोग्यविषयक सूचना व जनजागृती संदेशांचे पालन करावे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण

जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार

#HeatWaveAlert#उष्णतेचीलाट#StaySafe#Nandurbar#WeatherAlert#PublicHealth#SummerPrecautions#DistrictAdministration#HeatSafety#CitizenAwareness#HealthAdvisory#MaharashtraWeather#TakeCare#EmergencyAwareness#SafeSummer

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: