जिल्हास्तरीय ‘लोकशाही दिन’ 04 मे रोजी;तक्रारींचे निवारण होणार-आशा संघवी

नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारी आणि अडचणींचे त्वरित निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सोमवार, दिनांक 04 मे 2026 रोजी जिल्हास्तरीय ‘लोकशाही दिना’चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होणारा हा कार्यक्रम दुपारी 01-00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात संपन्न होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. दर महिन्याच्या तिसऱ्या […]
जिल्हास्तरीय ‘लोकशाही दिन’ 04 मे रोजी;तक्रारींचे निवारण होणार-आशा संघवी
District level 'Democracy Day' on 04th May; Grievances will be redressed - Asha Sanghvi

नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारी आणि अडचणींचे त्वरित निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सोमवार, दिनांक 04 मे 2026 रोजी जिल्हास्तरीय ‘लोकशाही दिना’चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होणारा हा कार्यक्रम दुपारी 01-00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात संपन्न होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय लोकशाही दिन होतो. नागरिकांनी आपल्या वैयक्तिक तक्रारी प्रथम येथे मांडणे आवश्यक आहे. जर तालुकास्तरावरील निर्णयाने समाधान झाले नाही, तर नागरिक दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनात आपले निवेदन सादर करू शकतात.

प्रशासकीय कामात पारदर्शकता आणणे आणि जनतेच्या समस्यांना न्याय देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून नागरिकांना या संधीचा लाभ घ्यावा असेही आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती संघवी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: