डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारणासाठी विकसित केलेल्या ‘ई-निरसन’ या अत्याधुनिक डिजिटल प्रणालीचे उद्घाटन

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आले.विद्यार्थ्यांना परीक्षा निकाल, गुणपत्रिका, पुनर्मूल्यांकन, प्रमाणपत्र आदी संदर्भातील तक्रारींसाठी प्रत्यक्ष लोणेरे येथे जाण्याची आवश्यकता भासू नये, यासाठी ‘ई-निरसन’ प्रणाली विकसित करण्यात आली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानावर आधारित ही प्रणाली तक्रारींचे स्वयंचलित वर्गीकरण करून त्या संबंधित विभागाकडे तत्काळ पाठवते. तसेच विद्यार्थ्यांना तक्रारीची सद्यस्थिती ‘लाइव्ह ट्रॅकिंग’द्वारे […]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारणासाठी विकसित केलेल्या ‘ई-निरसन’ या अत्याधुनिक डिजिटल प्रणालीचे उद्घाटन
Dr. Babasaheb Ambedkar University of Technology inaugurated the state-of-the-art digital system ‘e-Nirsan’ developed for student grievance redressal

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आले.विद्यार्थ्यांना परीक्षा निकाल, गुणपत्रिका, पुनर्मूल्यांकन, प्रमाणपत्र आदी संदर्भातील तक्रारींसाठी प्रत्यक्ष लोणेरे येथे जाण्याची आवश्यकता भासू नये, यासाठी ‘ई-निरसन’ प्रणाली विकसित करण्यात आली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानावर आधारित ही प्रणाली तक्रारींचे स्वयंचलित वर्गीकरण करून त्या संबंधित विभागाकडे तत्काळ पाठवते. तसेच विद्यार्थ्यांना तक्रारीची सद्यस्थिती ‘लाइव्ह ट्रॅकिंग’द्वारे पाहता येते. या प्रणालीमुळे तक्रार निवारण प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक व कार्यक्षम होणार असून विद्यार्थ्यांचा वेळ व खर्च मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या साह्याने अधिक पारदर्शक आणि सुलभ सेवा देण्याचा प्रयत्न असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.

विज्ञापित

याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत, परीक्षा नियंत्रक डॉ. नरेंद्र जाधव तसेच कुलसचिव डॉ. शेष उपस्थित होते.

#ई-निरसन

विज्ञापित
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: