नंदुरबार जिल्ह्यातील पहिला सोयाबीन प्रक्रिया उद्योग कार्यान्वित

नंदुरबार जिल्ह्यात ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला असून जिल्ह्यातील पहिला सोयाबीन प्रक्रिया उद्योग कार्यान्वित झाला आहे. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) पुरस्कृत व डॉ. हेडगेवार सेवा समिती, नंदुरबार संचलित पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत मौजे श्रावणी, ता. नवापूर येथे महिला बचत गटाच्या माध्यमातून हा उद्योग सुरू करण्यात आला आहे. या सोयाबीन […]
नंदुरबार जिल्ह्यातील पहिला सोयाबीन प्रक्रिया उद्योग कार्यान्वित
First soybean processing industry in Nandurbar district commissioned

नंदुरबार जिल्ह्यात ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला असून जिल्ह्यातील पहिला सोयाबीन प्रक्रिया उद्योग कार्यान्वित झाला आहे. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) पुरस्कृत व डॉ. हेडगेवार सेवा समिती, नंदुरबार संचलित पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत मौजे श्रावणी, ता. नवापूर येथे महिला बचत गटाच्या माध्यमातून हा उद्योग सुरू करण्यात आला आहे.

या सोयाबीन प्रक्रिया उद्योगाचे उद्घाटन माननीय जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी त्यांनी युनिटची पाहणी करत प्रकल्पाची कार्यपद्धती जाणून घेतली. या उद्योगासाठी कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार यांचे तांत्रिक सहकार्य लाभले आहे.

कार्यक्रमास जिल्हा नियोजन अधिकारी श्री. शशांक काळे, नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक श्री. रविंद्र मोरे, डॉ. हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष श्री. केदारनाथ कवडीवाले, जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी श्री. नंदकुमार पैठणकर, पाणलोट क्षेत्र विकास समितीचे अध्यक्ष श्री. संदीप कोकणी , उमेदचे श्री यशवंत ठाकूर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, तज्ज्ञ व मान्यवर उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी म्हणाल्या की, स्थानिक कृषी उत्पादनावर प्रक्रिया केल्यास शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळतो. नंदुरबार जिल्ह्यात प्रक्रिया उद्योगासाठी मोठ्या संधी असून महिला बचत गट व शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन आर्थिक उन्नती साधावी.

नाबार्डचे श्री. रविंद्र मोरे यांनी व्यवसायात सातत्य, गुणवत्ता व विक्री व्यवस्थापनावर भर देण्याचे आवाहन केले. या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन त्यांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यास मोठी मदत होणार आहे. कार्यक्रमात सोयाबीनपासून तयार करण्यात आलेल्या विविध प्रक्रिया पदार्थांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले.

#Nandurbar#SoybeanProcessing#WomenEmpowerment#SelfHelpGroup#NABARD#RuralDevelopment#WatershedDevelopment#DrMittaliSethi#AtmanirbharBharat#AgroProcessing

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: