कृषी क्षेत्राच्या विकासासाठी शेतकऱ्यांचा क्षमता विकास करून प्रक्रिया उद्योगासह इतर संलग्न क्षेत्राशी त्याची बृहद जोडणी करण्यात येईल.

आवश्यक धोरण तयार करण्यात येईल व आवश्यक निधी राज्य शासनाकडून देण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. वातावरणातील बदलामुळे शेतीमध्ये झालेले बदल हे या क्षेत्रासमोरील मोठे आव्हान आहे. यासंदर्भात उचित उपाययोजना करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. कृषी क्षेत्रात मुल्यवर्धन करून शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त फायदा होण्याच्या दिशेने शासनाचे प्रयत्न आहेत. यासोबतच अन्न प्रक्रिया उद्योगाशी […]
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी शेतकऱ्यांचा क्षमता विकास करून प्रक्रिया उद्योगासह इतर संलग्न क्षेत्राशी त्याची बृहद जोडणी करण्यात येईल.
For the development of the agricultural sector, the capacity of farmers will be developed and its extensive linkages with other allied sectors including the processing industry will be established.

आवश्यक धोरण तयार करण्यात येईल व आवश्यक निधी राज्य शासनाकडून देण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

वातावरणातील बदलामुळे शेतीमध्ये झालेले बदल हे या क्षेत्रासमोरील मोठे आव्हान आहे. यासंदर्भात उचित उपाययोजना करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. कृषी क्षेत्रात मुल्यवर्धन करून शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त फायदा होण्याच्या दिशेने शासनाचे प्रयत्न आहेत. यासोबतच अन्न प्रक्रिया उद्योगाशी या क्षेत्राला जोडण्याचे कार्यही सुरू आहे. परिणामी शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळत आहे. कृषी संबंधित उर्वरित क्षेत्रामध्ये प्रक्रिया पद्धती रूजवून उचित परिसंस्था उभारण्याच्या दिशेनेही प्रयत्न सुरू आहेत, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

#FoodProcessingConclave

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: