केंद्रीय पथकाकडून सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी
सोलापूर : खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थिती आणि पीक नुकसानीची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी केंद्र शासनाच्या आंतर-मंत्रालयीन केंद्रीय पथकाने आज बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे व पानगाव येथे प्रत्यक्ष शेतपाहणी केली.
पावसाअभावी जळालेली सोयाबीनची पिके, तूर पिकांची स्थिती आणि पानगाव येथील पूर्णपणे कोरडा पडलेला साठवण तलाव यांची पाहणी करून पथकाने शेतकऱ्यांशी संवाद साधला.केंद्रीय पथकाचे नेतृत्व कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या पीक विभागाचे संचालक डॉ. के. पोन्नुसामी करीत आहेत. पथकामध्ये पेयजल व स्वच्छता विभागाचे टीम लीडर अबसार अहमद खान आणि अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे सहाय्यक संचालक सुमित शर्मा यांचा समावेश आहे. कृषी आयुक्त सूरज मांढरे हेदेखील पथकासोबत उपस्थित होते.
Follow Us:

