ग्रामपंचायत पळसून येथे ‘जलतारा’ कामाचा शुभारंभ; मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या हस्ते सुरुवात!
‘जलतारा’ तंत्रज्ञानाने वाढणार भूजल पातळी.
ग्रामीण भागात पाण्याची टिकवुण ठेवण्यासाठी ‘जलतारा’ हे अतिशय प्रभावी आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान असुन या तंत्रज्ञानामुळे शेतशिवारात आणि विहिरींच्या आसपास भूजल पातळी वाढण्यास मोठी मदत होणार आहे. जिल्हयातील दुष्काळ परिस्थितचा विचार करता तलावातील गाळ काढणे, विहीर पुनर्भरण (Well Recharge) आणि जलसिंचनाची विविध कामे तातडीने मार्गी लावण्यावर भर दिला जात असून, यासंबंधित प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
प्रशासन आणि नागरिकांचे संयुक्त पाऊल – जलस्वयंपूर्णतेचा संकल्प
याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी ग्रामपंचायत, तालुका व जिल्हा प्रशासकीय यंत्रणेमार्फत सर्व संबंधित ग्रामपंचायती, शेतकरी आणि नागरिकांनी या महत्त्वाकांक्षी अभियानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. आपल्या भागातील जलसुरक्षा बळकट करण्यासाठी आणि परिसर दुष्काळमुक्त करण्यासाठी ‘जलतारा’ कामांसोबतच गाळ उपसा व विहीर पुनर्रचनेचे प्रस्ताव वेळेत सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
आपला परिसर दुष्काळमुक्त आणि जलस्वयंपूर्ण बनवण्यासाठी प्रशासनाच्या या लोकउपक्रमात सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवणे ही काळाची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

