भोणे व शिंदे गावात औद्योगिक पाहणी; राख व धुरामुळे झालेल्या शेती नुकसानीची प्रत्यक्ष दखल

भोणे गावात कार्यरत असलेल्या वीटभट्टीची तसेच शिंदे गावातील आयान साखर कारखान्याची मा. उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान भोणे गावातील वीटभट्टीतून निघणाऱ्या धुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून नागरिकांच्या आरोग्यावरही प्रतिकूल परिणाम होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी मांडल्या. विशेषतः आयान मल्टिट्रेड साखर कारखान्यातून निघणाऱ्या चिमणीच्या धुरामुळे बाधित झालेल्या शिंदे गावाला मा. […]
भोणे व शिंदे गावात औद्योगिक पाहणी; राख व धुरामुळे झालेल्या शेती नुकसानीची प्रत्यक्ष दखल
Industrial inspection in Bhone and Shinde villages; First-hand observation of agricultural damage caused by ash and smoke

भोणे गावात कार्यरत असलेल्या वीटभट्टीची तसेच शिंदे गावातील आयान साखर कारखान्याची मा. उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान भोणे गावातील वीटभट्टीतून निघणाऱ्या धुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून नागरिकांच्या आरोग्यावरही प्रतिकूल परिणाम होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी मांडल्या.

विशेषतः आयान मल्टिट्रेड साखर कारखान्यातून निघणाऱ्या चिमणीच्या धुरामुळे बाधित झालेल्या शिंदे गावाला मा. अंजली शर्मा यांनी भेट देऊन स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधला. धूर व राखेमुळे पिकांचे नुकसान, आरोग्यावर होणारे दुष्परिणाम तसेच दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या अडचणी ग्रामस्थांनी यावेळी मांडल्या.

पाहणीदरम्यान संबंधित यंत्रणांना पर्यावरणीय नियमांचे काटेकोर पालन, प्रदूषण नियंत्रण उपायांची अंमलबजावणी आणि बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने उपाययोजना करून शेती व आरोग्याचे संरक्षण करण्याला प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.

ही पाहणी प्रशासन–नागरिक संवाद मजबूत करणारी ठरली असून औद्योगिक विकासासोबतच पर्यावरण संरक्षण व शेतकऱ्यांच्या हिताचे संतुलन राखण्याचा प्रशासनाचा स्पष्ट संदेश यातून देण्यात आला.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: