संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेला २३ जून हा ‘आंतरराष्ट्रीय विधवा दिन’ राज्यातील सर्व महापालिका
नगरपालिका, नगरपंचायत आणि ग्रामपंचायतींमध्ये ‘एकल महिला दिवस’ म्हणून साजरा करण्यात यावा, यावेळी गावातील किंवा शहरातील सर्व एकल महिलांना सन्मानाने या कार्यक्रमाला निमंत्रित करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत. एकल महिलांच्या सन्मानासाठी ग्रामपंचायतींमध्ये ठराव करण्यात यावा असेही त्या म्हणाल्या. राज्य शासनामार्फत एकल महिला धोरण तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून या पार्श्वभूमीवर […]
नगरपालिका, नगरपंचायत आणि ग्रामपंचायतींमध्ये ‘एकल महिला दिवस’ म्हणून साजरा करण्यात यावा, यावेळी गावातील किंवा शहरातील सर्व एकल महिलांना सन्मानाने या कार्यक्रमाला निमंत्रित करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत. एकल महिलांच्या सन्मानासाठी ग्रामपंचायतींमध्ये ठराव करण्यात यावा असेही त्या म्हणाल्या.
राज्य शासनामार्फत एकल महिला धोरण तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून या पार्श्वभूमीवर एकल महिलांच्या समस्या, अपेक्षा आणि त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले.
बैठकीस महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, आयुक्त माधवी सरदेशमुख, आयुक्त डॉ. जगदीश मणियार (दूरदृश्य प्रणालीद्वारे), सहसचिव वी. आर. ठाकूर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Follow Us:

