मका, तूर पिकांच्या आड गांजाची शेती उद्ध्वस्त; २ कोटी २१ लाखांचा गांजा जप्त

नंदुरबार : मका आणि तूर या अंतरपिकांच्या आड गांजाची लागवड करून मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थाची शेती केली जात असल्याचा प्रकार नंदुरबार जिल्ह्यात उघडकीस आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत तब्बल ४४३ किलो गांजाची झाडे जप्त करण्यात आली असून, त्यांची अंदाजे किंमत २ कोटी २१ लाख ५८ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मका, तूर पिकांच्या आड गांजाची शेती उद्ध्वस्त; २ कोटी २१ लाखांचा गांजा जप्त
maka-tur-pikanchya-ad-ganjyachi-sheti-uddhvasta-2-koti-21-lakhanchi-ganja-japt

नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला शेतशिवारात गांजाची लागवड करण्यात आल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पथकाला तातडीने कारवाई करण्याचे

त्यानुसार पोलिसांच्या पथकाने संबंधित शेतशिवारात पाहणी केली असता मका व तूर या पिकांच्या आड गांजाची लागवड केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून शेतात धाड टाकली. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर आदेश दिले. गांजाची झाडे आढळून आली. पोलिसांनी पंचनामा करून गांजाची झाडे जप्त केली.

या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत सुमारे २ कोटी २१ लाख ५८ हजार रुपये असून, एकूण ४४३ किलो वजनाचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई सुरू करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील दुर्गम व ग्रामीण भागात पिकांच्या आड अमली पदार्थांची लागवड होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केल्याने गांजा लागवड करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अमली पदार्थांची लागवड, विक्री आणि तस्करीविरोधात यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. कारवाईत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250