विहीर दुरुस्तीसाठी एक लाख, तर ठिबक सिंचनाला ९७ हजार अनुदान!

राज्य शासनातर्फे अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना’ आणि अनुसूचित जमातीतील (आदिवासी) शेतकऱ्यांसाठी ‘बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना’ राबविण्यात येत आहेत.
विहीर दुरुस्तीसाठी एक लाख, तर ठिबक सिंचनाला ९७ हजार अनुदान!
₹1 lakh grant for well repairs, ₹97k for drip irrigation
    • अनुदानाचा तपशील: या योजनांतर्गत विविध कृषी घटकांसाठी खालीलप्रमाणे अनुदान दिले जाते:
        • नवीन सिंचन विहीर: ₹४ लाख
        • जुन्या विहिरीची दुरुस्ती: ₹१ लाख
        • ठिबक सिंचन संच: ₹९७ हजार
        • विद्युत पंप संच: ₹४० हजार

    • अर्ज करण्याची पद्धत: शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी (MahaDBT) शेतकरी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अर्जाची सद्यस्थिती, निवड प्रक्रिया आणि अनुदानाच्या उपलब्धतेबाबत पंचायत समिती किंवा संबंधित कृषी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
    • आवश्यक कागदपत्रे व अटी: अर्जदार संबंधित योजनेच्या पात्र प्रवर्गातील असावा. अर्जासोबत शेतजमिनीची मालकीचा पुरावा (७/१२, ८-अ), जात प्रमाणपत्र, आधार कार्डशी संलग्न बँक खात्याचा तपशील आणि उत्पन्न दाखला असणे आवश्यक आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: