विकसित भारत-रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण) योजना (VB-G RAM G)

जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न! जिल्हा परिषद, नंदुरबार येथे विकसित भारत-रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण) योजना (VB-G RAM G) अंतर्गत जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
विकसित भारत-रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण) योजना (VB-G RAM G)
Viksit Bharat - Guarantee for Rozgar and Ajeevika Mission (Gramin)
या कार्यशाळेस श्रीमती उषाराणी देवगुणे-दहिकर, उपजिल्हाधिकारी (VB-G RAM G) तसेच श्री. अनिल बिऱ्हाडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (VB-G RAM G) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यशाळे मध्ये योजनेतील अनुज्ञेय कामांचे नियोजन व अंमलबजावणी, VGPP, जलसुरक्षा, मूलभूत पायाभूत सुविधा, उपजीविका व आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कामे तसेच विविध विभागांमधील अभिसरण, ग्रामपंचायत स्तरावरील प्रभावी नियोजन, तांत्रिक अंमलबजावणी व संनियंत्रण याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
 प्रशिक्षणाची प्रमुख उद्दिष्टे
  •  योजनेविषयी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सविस्तर माहिती देणे.
  •  ग्रामपंचायत स्तरावर गरजाधारित व परिणामकारक कामांचे नियोजन करणे.
  •  जलसुरक्षा, रोजगारनिर्मिती व शाश्वत मालमत्ता निर्मितीला चालना देणे.
 विविध विभागांच्या समन्वयातून ग्रामीण विकासाला गती देणे.
या प्रशिक्षणामध्ये संबंधित प्रशिक्षकांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच प्रशिक्षणार्थींनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून सहभाग नोंदवून योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक माहिती व मार्गदर्शन प्राप्त केले.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: