नंदुरबार जिल्ह्यात महसूल विभागाच्या कामकाजाचा आढावा; महसूल वसुली वाढविण्यासह प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याचे निर्देश
(नंदुरबार) जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे महसूल विभागाच्या कामकाजाचा व गौण खनिज विषयक प्रकरणांचा आढावा घेण्यात आला.
यावेळी जमीन महसूल व गौण खनिज वसुली, प्रलंबित फेरफार नोंदी, खरीप हंगाम सर्वेक्षण, ॲग्रीस्टॅक योजना आणि अवैध उत्खनन व वाहतूक प्रकरणांचा आढावा घेण्यात आला.
- जिल्ह्यात महसूल व गौण खनिज वसुलीचे उद्दिष्ट नुसार करण्यात येत आहे. तसेच १,७४८ फेरफार नोंदी प्रलंबित असून, खरीप हंगामातील ८४.४० टक्के भूखंडांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
- ॲग्रीस्टॅक योजनेंतर्गत ८८.६७ टक्के शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. अवैध उत्खनन व वाहतुकीवर नियंत्रण, प्रलंबित दंडवसुली, जमीन विक्री परवानगीची प्रकरणे आणि गौण खनिज विषयक तक्रारींचे नियमानुसार निराकरण करण्यावर भर देण्यात आला.
- सर्व संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी प्रलंबित कामांचा नियमित आढावा घेऊन आवश्यक कार्यवाही करावी आणि अद्ययावत अहवाल सादर करावा, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
Follow Us:

