पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली उद्या नंदुरबार जिल्हा नियोजन समितीची बैठक

(नंदुरबार) राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबार जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवार, दि. 14 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे यांनी दिली आहे. बैठकीत जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 अंतर्गत प्राप्त […]
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली उद्या नंदुरबार जिल्हा नियोजन समितीची बैठक
Meeting of the Nandurbar District Planning Committee tomorrow under the chairmanship of Guardian Minister Hasan Mushrif.

(नंदुरबार) राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबार जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवार, दि. 14 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे यांनी दिली आहे.

बैठकीत जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 अंतर्गत प्राप्त निधी, प्रलंबित व अपूर्ण विकासकामे तसेच निधीच्या विनियोगाच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्यासाठी आणि विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पालकमंत्री श्री. मुश्रीफ संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देणार आहेत.

या बैठकीस जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, लोकप्रतिनिधी तसेच जिल्ह्यातील संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

जिल्हा नियोजन समितीची बैठक संपल्यानंतर पालकमंत्री श्री. मुश्रीफ पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. या पत्रकार परिषदेस सर्व प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी श्री. काळे यांनी केले आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: