Home नंदुरबार जिल्हा मिशन गरुडझेप अंतर्गत शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन

मिशन गरुडझेप अंतर्गत शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन

1
Scholarship practice exam organized under Mission Garudzep

शालेय शिक्षण विभागामार्फत चालू शैक्षणिक वर्षापासून इयत्ता चौथी व सातवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात येत आहे. यावर्षीची परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत दिनांक 26 एप्रिल रोजी होणार आहे.

विद्यार्थ्यांची तयारी अधिक सक्षम व्हावी व जिल्ह्याची शिष्यवृत्ती टक्केवारी वाढावी, या उद्देशाने मा. जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले.

मागील सात ते आठ आठवड्यांपासून जिल्ह्यातील शाळा व केंद्र स्तरावर विद्यार्थ्यांचा सराव घेण्यात आला. तसेच जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये तालुकास्तरीय सराव परीक्षेचे नियोजन करण्यात आले. प्रत्येक केंद्रातून इयत्ता चौथीचे 5 व सातवीचे 5 असे विद्यार्थी निवडून या सराव परीक्षेस प्रविष्ट करण्यात आले.

या सराव परीक्षेमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास तसेच प्रत्यक्ष परीक्षेसाठी तयारी अधिक भक्कम होण्यास मदत झाली. सदर सराव परीक्षेत इयत्ता चौथीचे 476 व सातवीचे 183 असे एकूण 659 विद्यार्थी सहभागी झाले.

या उपक्रमासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. दीपक साबळे, वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. रमेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अधिव्याख्याता चंद्रकांत पवार, प्रदीप पाटील, विनोद लवांडे, सुभाष वसावे यांच्या सहकार्याने सराव प्रश्नसंच व प्रश्नपत्रिका तयार करण्यात आल्या.

तसेच शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भानुदास रोकडे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वंदना वळवी, उपशिक्षणाधिकारी निलेश लोहकरे, डॉ. युनूस पठाण व सर्व गटशिक्षणाधिकारी यांनी या उपक्रमात महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवला.

तालुकास्तरीय सराव परीक्षेचे नियोजन गटशिक्षणाधिकारी जयंत चौरे, प्रशांत नरवडे, डॉ. योगेश सावळे, रमेश देसले, धनराज राजपूत, शेखर धनगर यांच्या सहकार्याने करण्यात आले.

शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका निर्मितीसाठी प्राथमिक शिक्षक श्री. अनिल सोनवणे, भूपेंद्र चौधरी व विषय सहाय्यक श्री. गोविंद वाडीले यांनी विशेष योगदान दिले.

#MissionGarudZep#ScholarshipExam#ScholarshipPreparation#Nandurbar#EducationInitiative#StudentSuccess#ExamPreparation#QualityEducation#FutureReady#AcademicExcellence#GovernmentInitiative#SchoolEducation#StudentDevelopment#ConfidenceBoost#LearningJourney#ScholarshipDrive#DistrictAdministration#EducationForAll#BrightFuture#StudySmart