विज्ञापित

देवरे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतली नशा मुक्त व अंमली पदार्थ प्रतिबंध विषयी शपथ

नंदुरबार(प्रतिनिधी):-श्री धंगाई विधायक कार्य मंडळ संचलित नंदुरबार तालुक्यातील आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथे नशा मुक्त युवा-विकसित भारत अभियानांतर्गत सामूहिक प्रतिज्ञेसह नशेचे दुष्परिणाम व निरामयीन व निकोप जीवनशैलीद्वारे उत्तम आरोग्यासाठीचे मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून उपशिक्षक डी.बी. भारती यांनी उपरोक्त विषयाला अनुसरून अभियानाची पार्श्वभूमी व उद्देश सांगितला. उपस्थित विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक- […]
देवरे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतली नशा मुक्त व अंमली पदार्थ प्रतिबंध विषयी शपथ
Students of Devare Vidyalaya took a pledge for a drug-free life and against substance abuse.

नंदुरबार(प्रतिनिधी):-श्री धंगाई विधायक कार्य मंडळ संचलित नंदुरबार तालुक्यातील आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथे नशा मुक्त युवा-विकसित भारत अभियानांतर्गत सामूहिक प्रतिज्ञेसह नशेचे दुष्परिणाम व निरामयीन व निकोप जीवनशैलीद्वारे उत्तम आरोग्यासाठीचे मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून उपशिक्षक डी.बी. भारती यांनी उपरोक्त विषयाला अनुसरून अभियानाची पार्श्वभूमी व उद्देश सांगितला. उपस्थित विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने नशा मुक्त अभियानाची सामूहिक प्रतिज्ञा घेतली. विद्यालयाचे मुख्याध्यापक
डी.डी.साळुंके यांनी व्यसनाधीनतेमुळे व अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती विद्यार्थ्यांना दिली  सक्षम व सुसंस्कृत पिढी घडविण्यासाठी सर्वांनी व्यसनाला व अंमली पदार्थांच्या प्रतिबंधात्मक अंमलबजावणी साठी सकारात्मक सहभागी होण्याचे आवाहन आपल्या मनोगतातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम. डी.नेरकर तर आभार सी.व्ही. नांद्रे यांनी व्यक्त केले.उपशिक्षक वाय. डी.बागुल, आर.आर.बागुल, एम.एस.मराठे,ए.एस.बेडसे, एस. एच.गायकवाड व्ही.बी.‌अहिरे तसेच डी.बी. पाटील, एस.जी. पाटील,एच.एम. खैरनार आदींनी संयोजन केले.

विज्ञापित
विज्ञापित
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: