सामान्य माणसाने असामान्य कसं व्हायचं, याचा वस्तुपाठ म्हणजे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा जीवनप्रवास आहे

आधुनिक काळातील ‘एकलव्य’ ही ओळख सार्थ ठरवली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. ‘रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल’च्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. नवी मुंबईतील सेक्टर १२, उलवे नोड येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग […]
सामान्य माणसाने असामान्य कसं व्हायचं, याचा वस्तुपाठ म्हणजे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा जीवनप्रवास आहे
The life journey of public figure Ramsheth Thakur is a lesson in how an ordinary person can become extraordinary.

आधुनिक काळातील ‘एकलव्य’ ही ओळख सार्थ ठरवली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.

‘रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल’च्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. नवी मुंबईतील सेक्टर १२, उलवे नोड येथे हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, ज्येष्ठ नेते तथा राज्यसभा खासदार शरद पवार, मंत्री गणेश नाईक, मंत्री ॲड.आशिष शेलार, मंत्री आदिती तटकरे, मंत्री भरत गोगावले, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार दिलीप वळसे पाटील, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यकारी मंडळ सदस्य तथा आमदार प्रशांत ठाकूर, लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव वर्ष नियोजन समितीचे अध्यक्ष तथा आमदार महेश बालदी आणि आमदार रविंद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

सामान्य कुटुंबात जन्म घेऊन मेहनतीच्या जोरावर असामान्य कर्तृत्व कसं गाजवायचं, याचा वस्तुपाठ म्हणजे रामशेठ ठाकूर यांचा जीवनप्रवास आहे. दागिने गहाण ठेऊन आणि १० हजार रुपयांच्या पहिल्या कंत्राटातून व्यवसायाची सुरुवात करणाऱ्या ठाकूर यांनी भूमिपुत्रही मोठे कंत्राटदार होऊ शकतात, हे आपल्या जिद्दीने सिद्ध केले. दि. बा. पाटलांच्या नेतृत्वाखाली भूमिपुत्रांच्या हक्कासाठी त्यांचा लढा ऐतिहासिक आहे. नवी मुंबई व रायगडचा विकास ‘मुंबईपेक्षाही सुंदर शहर’ म्हणून करण्याचे सरकारचे ध्येय आहे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

०००

“लोकनेते रामशेठ ठाकूर हे केवळ उद्योजक नसून भूमिपुत्रांच्या हक्कासाठी लढणारे आणि विकासाला गती देणारे कणखर नेतृत्व आहे,” १९९५ च्या काळात कंत्राटदारांनी अर्धवट सोडलेली मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आणि उड्डाणपुलांची कामे रामशेठ ठाकूर यांच्या धाडसी सहकार्यामुळेच पूर्ण होऊ शकली.

जेएनपीटी आणि सिडकोच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांना रोजगार मिळवून देण्यासाठी मोठा संघर्ष केला. विकासाची फळे स्थानिक माणसापर्यंत पोहोचली पाहिजेत, हा त्यांचा विचार मोलाचा आहे. नवी मुंबई आणि रायगडच्या सर्वांगीण प्रगतीत त्यांची दूरदृष्टी महत्त्वाची ठरली असून त्यांना उदंड आयुष्य लाभो, अशा शुभेच्छा – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: