दुष्काळग्रस्तांच्या मदतीला माणुसकीचा हात

छत्रपती संभाजीनगर– दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी आणि दिवाळीच्या प्रसंगी आपण त्यांच्यासोबत आहोत, ही भावना रुजविण्यासाठी आज सामाजिक न्याय तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शिवगड तांडा येथे जाऊन शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी केली. त्यांना मिठाई, भेटवस्तू व शिधा वाटप केले.
दुष्काळग्रस्तांच्या मदतीला माणुसकीचा हात
A Helping Hand of Humanity Extended to the Drought-Affected!

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानुसार, यंदा दिवाळीत शेतकऱ्यांच्या सोबत, गावात जाऊन दिवाळी साजरी करण्यात येत आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनानुसार दुष्काळग्रस्त नागरिकांना दिवाळीची भेट म्हणून जीवनावश्यक वस्तूंच्या शिध्याचे वाटप करण्यात येत आहे.

यानिमित्त आज पालकमंत्री शिरसाट यांनी आज शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करीत माणुसकीचा संदेश दिला.

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील शिवगड तांडा येथे दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकरी कुटुंबांची भेट घेण्यात आली. यावेळी शेतकरी रंगनाथ नाना नवगिरे यांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्यात आली. त्यांच्या कुटुंबीयांना कपडे, फराळ, मिठाई देत आपुलकीने संवाद साधण्यात आला. या भेटीतून शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा आणि संकटाच्या काळात त्यांना आधार देण्याचा संदेश देण्यात आला.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: