खरीप वाया गेल्यानंतर आता रब्बीची तयारी! नवापूर तालुक्यातील हळदाणी परिसरात शेती कामांना वेग

नवापूर तालुक्यातील हळदाणी परिसरात शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी शेतजमिनीची नांगरणी सुरू केली असून, दुष्काळी परिस्थितीमुळे पिके जगवायची कशी असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
खरीप वाया गेल्यानंतर आता रब्बीची तयारी! नवापूर तालुक्यातील हळदाणी परिसरात शेती कामांना वेग
rabi-season-preparation-navapur-haldani-agricultural-work-gains-momentum
    • खरीप हंगामात मोठे नुकसान: यंदाच्या पावसाळ्यात हळदाणी व परिसरातील गावांमध्ये खूपच कमी पाऊस झाला, तसेच अनियमित वीजपुरवठ्यामुळे पिकांना पाणी देणे कठीण झाल्याने खरीप पिकांचे उत्पादन घटले आहे.
    • रब्बी हंगामावर मदार: खरीप हंगामात उत्पन्न कमी आल्यामुळे आता शेतकऱ्यांचे संपूर्ण लक्ष रब्बी हंगामाकडे लागले आहे.
    • मशागतीच्या कामांना वेग: रब्बीच्या पेरणीपूर्व तयारीसाठी परिसरातील शेतकरी ट्रॅक्टर आणि बैलजोडीच्या मदतीने शेतीची नांगरणी करत आहेत.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: