मांजरीचा पाठलाग करताना बिबट्या पडला विहिरीत

नवापूर तालुक्यातील प्रतापपूर येथील शेतकरी जगन्नाथ गावित यांच्या शेतात शनिवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. रात्री राखण करत असताना विहिरीत काहीतरी पडल्याचा आवाज आल्याने त्यांनी बॅटरीच्या प्रकाशात पाहिले असता बिबट्या पडल्याचे दिसले.
मांजरीचा पाठलाग करताना बिबट्या पडला विहिरीत
Leopard Falls Into Well While Chasing Cat!
  • कारण: रात्रीच्या वेळी मांजर जोरात पळताना दिसली होती. त्या मांजरीचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
  • रेस्क्यू ऑपरेशन: घटनेची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश ठाकूर यांच्या पुढाकाराने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले.
  • सुटका: वनविभागाचे कर्मचारी आणि ग्रामस्थांनी अथक प्रयत्न करून रविवारी सायंकाळी बिबट्याला विहिरीतून सुरक्षित बाहेर काढले आणि त्याला नैसर्गिक अधिवासात (जंगलात) सुखरूप सोडून दिले.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: